खवलोत्सव । चिपळूण मधील डुगवे गावी होते खवले मांजराची पूजा । Khawalotsav | World Pangolin Day Dugave
World Pangolin Day 2020 at Dugave, Chiplun #Khawlu #UnexploredKonkan
खवले मांजर म्हणजेच Pangolin या विशिष्ट प्राण्याची शिकार आणि तस्करी थांबवावी आणि त्याचं संरक्षण आणि जतन व्हावं यासाठी सह्याद्री निसर्ग मित्र यांनी World Pangolin Day म्हणजेच जागतिक खवले मांजर दिनी, चिपळूण मधील डुगवे गावी खावलोत्सव ची संकल्पना सुरु केली.
या महोत्सवामुळे लोकांमध्ये खवले मांजराबद्दल जनजागृती निर्माण होईल आणि त्यांचं संरक्षण होऊन त्यांची संख्या वाढण्यास मदत होईल असा त्यांचा प्रयत्न आहे.
सह्याद्री निसर्ग मित्र हि संस्था गेली ३-४ वर्षे खवले मांजरावर अभ्यास करून त्याचे निसर्गातील महत्व लोकांना समजावून देत आहेत. डुगवे गावातील गावकरी सुद्धा या महोत्सवाला आणि खवले मांजर संवर्धनाला तेवढीच मोलाची साथ देत आहेत.