Secret Shiv Khori Cave | Jammu | Full Information | शिव खोरी गुफा जम्मू माहिती
शिव खोरी गुफेमधून अमरनाथ गुफेत जायला गुप्त रास्ता आहे
शिव खोरी हे जम्मू मधील कटरा किंवा वैष्णो देवी पासून ७५ ते ८० किलोमीटर लांब आहे. येथे तुम्ही बसने किंवा प्रायव्हेट गाडी करून पोहोचू शकता. पार्किंग पासून सुमारे दिड ते दोन किलिमीटर तुम्हाला शेअरिंग रिक्षा ने जावे लागते. या रिक्षा साठी प्रत्येकी १० रुपये आकारले जातात हि रिक्षा तुम्हाला रजिस्ट्रयेशन काउंटर पर्यंत सोडते येथे फ्री रजिस्टर करून तुमचा प्रवास चालू होतो. जर तुम्हाला गुफे पर्यंत जाण्यासाठी घोडा पाहिजे असेल तर तोही तेथेच मिळतो नाहीतर तुम्ही ३.५ किलोमीटर चा प्रवास पायी करू शकता.
येथील वातावरण आणि निसर्ग अतिशय सुंदर आहे. गुफे पर्यंत पोहोचताना तुम्हाला अजिबात थकवा जाणवणार नाही.
कदाचित या निसर्गामुळेच भगवान शंकरानी आपल्या कुटुंबा सह वास्तव्य करण्यासाठी हि जागा निवडली असेल.
भस्मासुर तर तुम्हाला माहीतच असेल अशी आख्यायिका आहे कि भस्मासुराने शंकर भगवानांना प्रसन्न करून त्यांच्याकडून वर घेतला कि मी ज्याच्या डोक्यावर हाथ ठेवेन तो भस्म झाला पाहिजे. आणि भोळ्या शंकराने त्याला तो वर दिला सुद्धा मग भस्मासुराला या गोष्टीचा गर्व झाला आणि तो शंकर भगवानांच्याच डोक्यावर हाथ ठेवून त्यांना भस्म करून देव बनायला निघाला. त्यावेळी शंकर भगवानांनी त्रिशूळ मारून हि गुफा बनवली व आपला परिवार आणि इतर देवांसह या गुफेत येऊन थांबले.
नंतर विष्णू देवाने मोहिनी रूप धारण करून भस्मासुराला स्वतःचाच हाथ स्वतःच्या डोक्यावर ठेवायला लावले. आणि भस्मासुर भस्म झाला.
या गुफेत जायला अगदीच निमुळती जागा आहे कुठे वाकून, कुठे झोपून तर कुठे दगडांना चिटकून आत जावे लागते. एका वेळी एक जण जाईल एवढीच जागा येथे आहे.
पण आतमध्ये गाभार्यात जेथे शिव लिंग आहे तेथे मोठी जागा आहे एका वेळी ३०० ते ३५० लोक बसतील एवढी जागा आहे.
गुफेत शिव लिंग आणि त्यावर १२ महिने अभिषेक करणारी गुप्त गंगा आहे त्याचं पाणी वर्षभर शिव लिंगावर अभिषेक करत असते सोबत शेष नाग देखील आहे.
येथे दगडांमध्ये बर्याच आकृत्या दिसतात जसे गणपती, पार्वती, कार्तिकेय, शंकर भगवानांच्या जटा, ब्रम्हा विष्णू महेश, सप्त ऋषी प्रत्येक आकृती हि वेग वेगळ्या देवांची प्रतिकृती आहे येथे आलात कि येथील पुजारी तुम्हाला त्याची माहिती देतात.
असं म्हणतात याच गुफे मधून अमरनाथ गुफेमधे जाण्यासाठी एक गुप्त वाट आहे जी वेग वेगळ्या गुफेमधून जाते पण आत्ता पर्यंत फक्त एकच साधू महाराज या वाटेने अमरनाथ गुफेपर्यंत जाण्यात यशस्वी ठरले आहेत ज्यासाठी त्यांना ६ महिने लागले बाकी ज्यांनी ज्यांनी हा प्रेयत्न केला ते कधीच भेटले नाहीत किंवा कधीच पुन्हा आले माहीत.
अशी हि रहस्यमयी गुफा. जर तुम्ही कधी जम्मू ला किंवा वैष्णो देवी ला गेलात तर या शिव खोरी गुफेला जरूर भेट द्या