Tsunami Island | Devbagh | Malvan
त्सुनामी आयलंड
कर्ली नदी मालवणच्या टोकाला, जेथे अरबी समुद्राला मिळते तेथे देवबाग जवळ हे बेट आहे. खर तर हे बेट पूर्वी पासूनच या ठिकाणी आहे. स्थानिक लोक याला “भाट” असं म्हणायचे. पण २००४ मध्ये आलेल्या त्सुनामी मुळे समुद्राच्या पाण्या बरोबर बरीच वाळू सुद्धा खाडी पात्रात आली. त्सुनामीचं पाणी हळू हळू कमी झालं, पण वाळूच्या परतीच्या मार्गात मोठे मोठे खडक असल्यामुळे ती वाळू समुद्रात न जाता या बेटावरच राहिली.
त्यामुळे आता या बेटाला आता त्सुनामी आयलंड म्हणतात या बेटावर बोटीने जावं लागते. देवबाग, भोगावे, निवती या बीचेस वरून येथे पोहोचता येते, पण देवबाग वरून जास्त आणि सतत बोटी असतात. म्हणून देवबाग हा उत्तम पर्याय. देवबागला पोहोचण्यासाठी कुडाळ वरून मालवण २५ किलोमीटर आणि मालवण वरून देवबाग ८ किलोमीटर असा गाडी ने प्रवास करावा लागतो .
देवबाग हे तारकर्ली बीच पासून फक्त ३ ते ४ किलोमीटर अंतरावर आहे. बोटीची तिकीट, एका बोटीसाठी ३०० रुपये घेतले जातात. त्यात ८ ते १० लोक बसतात. तसेच वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हीटीसाठी वेगवेगळे चार्जेस आहेत.
अशाच कोकणातील अनएक्सप्लोर्ड जागा अनुभवण्यासाठी www.thesolotravellers.in ला भेट द्या.